को.ए.सो.च्या विकास नियतकालिकाचे वितरण

। पेझारी । वार्ताहर ।

महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय अ‍ॅड. दत्ता पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या कार्याची धुरा सांभाळणारे कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय दत्ता पाटील, उपाध्यक्षा अ‍ॅड. नंदा देशमुख, कार्यवाह अ‍ॅड. सिद्धार्थ पायल व कार्यकारी मंडळच्या मार्गदर्शनाखाली को.ए. सोच्या माध्यमांतून प्रत्येक हायस्कूलला विकास नियतकालिकांचे वाटप करण्यात आले.

नाना पाटील हायस्कूल पोयनाड येथे या चिमण विकास नियतकालिकाचे वाटप महाराष्ट्र दिनाचे औचित्य निमित्ताने या हायस्कूलचे सभापती तथा माजी आ. पंडीत पाटील यांचे हस्ते विद्यार्थ्यांना वितरण करण्यांत आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर फडतरे, राजाभाऊ हळदवणकर, यशवंत पाटील, प्रकाश म्हात्रे, मोहनराव मंचुके, सुरेश पाटील, अनिल पाटील, संदेश पाटील, पांडुरंग पारीज शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या विकास नियतकालिक वितरण प्रसंगी बोलताना संस्थेचे संचालक पंडीत पाटील म्हणाले की, आज कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय पाटील व कार्यकारी मंडळ, मुख्य कार्यकारी आधिकारी विनायक खोपकर, सचिव अशोक गावडे यांच्या सहकार्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, यांनी लिहिलेले लेख, कविता, निबंध आदी वाचनीय साहित्य आपल्यापर्यंत पोहचविले आहे. त्याचे विद्यार्थ्यांनी संपूर्ण वाचन केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी सर्व उपस्थितांचे शाळेचे मुख्याध्यापक फडतरे यांनी आभार मानले.

Exit mobile version