पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचा पुढाकार
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळाने विहूर गावातील आदिवासीवाडी येथे दिवाळी फराळ वाटप केले. यावेळी येथील आदिवासी मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहात असल्याचे चित्र दिसून आले.
मुरुड येथील समुद्रकिनारी व्यवसाय करणार्या स्टॉलधारकांनी स्थापन केलेल्या पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळाच्यावतीने गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग जवळपासच्या विहूर येथील आदिवासी बांधवांना मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांच्या पुढाकारातून दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. पद्मदुर्ग व्यावसायिक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे याठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याबद्दल व फराळ वाटप करण्यात आल्याने आदिवासी वाडीतील मुलांची दिवाळी गोड झाली असल्याची प्रतिक्रिया स्थानिक बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी पद्मदुर्ग मंडळ अध्यक्ष अरविंद गायकर, उपाध्यक्ष दिव्या सतविडकर, दामोदर खरगावकर, दिव्येश बोरदे, तन्वी भायदे, जान्हवी सतविडकर, कविता खरगावकर, इम्तियाज शाबान, हरिराम बहोल, अनिता भगत, अथर्व बंडगड, देवेन सतविडकर आदी मान्यवर उपस्थित होते.