ग्रामस्थांना ई श्रम कार्डचे वाटप

नसरापूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतीमधील सर्व गावांतील रोजंदारी कामगारांचे ई श्रम कार्ड बनविण्याची केंद्र सरकारची योजना राबविण्यात आली. ग्रामपंचायतीमधील तब्ब्ल 627 ग्रामस्थांची नोंद इ श्रम कार्डधारक म्हणून करण्यात आली.
देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने ई-श्रम योजना श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून असंघटित कामगारांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने शासनामार्फत मिळणार्‍या योजना व सोयी सवलतींचा लाभ व्हावा म्हणून ई-श्रम कार्ड योजना राबवत आहे. महिला बचतगट, सालवड आणि कळंबोली आदिवासी महिलांची विशेष सभा लावून त्यांना प्रत्येक ग्रामस्थाने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
नसरापूर ग्रामपंचायतमधील असंघटित मजुरांची नोंद करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत कर्मचारी मोतीराम कोळंबे, शरद तिखंडे, ऑपरेटर रोशनी कोळंबे, ग्रुप ग्रामपंचायत कशेले ऑपरेटर भाग्यश्री राजेंद्र काळोखे, ग्रुप ग्रामपंचायत सावळे ऑपरेटर उमेश धुळे, ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोली ऑपरेटर हासू डायरे यांनी मदत केली.
या कार्यक्रमाला सरपंच प्रमिला मोहिते, उपसरपंच अ‍ॅड. संपत हडप, रुपाली कोळंबे, पांडुरंग जयराम बागडे, अमित देशमुख, किरण कोळंबे, दीपा कोळंबे, शैला हिलम, रंजना कोळंबे, साईनाथ मोहिते, वैभव कडव आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version