प्रधान महाविद्यालयातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

। नागोठणे । वार्ताहर ।
कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील जैन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. आनंदीबाई महाविद्यालय महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यकीय अधिकारी डॉ. हीबा सद्दाम दफेदार यांच्या हस्ते 90 विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, डेटॉल साबण, सॅनिटायझर, नॅपकिन आदी वस्तूंचे किट प्रत्येकांना देण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संदेश गुरव, साधना गुरव, मुख्याध्यापिका जाधव ,डॉ. विकास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वंयसेवक विद्यार्थीनी तसेच शाळेच्या सर्व शिक्षिका या प्रसंगी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात डॉ. हीबा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता राखण्यासाठी दररोज आंघोळ करणे, नियमित आपल्या हाताची नखे कापावीत, तसेच दोन वेळा दात स्वच्छ घासावेत ज्यामुळे आपण नेहमी निरोगी राहू व शाळेत नियमित येऊ शकु अशा सुचना दिल्या. उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली रा. से. यो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व महिला विभाग प्रमुख डॉ. सौ स्मिता चौधरी यांनी यशस्वीपणे केले. स्वाती मिश्रा हिने उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version