। कोलाड । वार्ताहर ।
लायन्स क्लब कोलाड-रोहा तर्फे रोहा तालुक्यातील राजिप प्राथमिक शाळा संभे येथील इयत्ता 1 ते 4 पर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या क्लबच्या माध्यमातून चार वर्षात विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याचे रविंद्र लोखंडे यांनी सांगितले.
लायन्स क्लबचा दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा हा सेवा सप्ताह म्हणून ओळखला जात असून या सप्ताहात लायन्स क्लबतर्फे विविध उपक्रम सुरु असतात. यानिमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना कोलाड-रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. मंगेश सानप यांनी तसेच क्लबचे उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी लायन्स क्लब कोलाड रोहाचे अध्यक्ष डॉ.मंगेश सानप, उपाध्यक्ष डॉ. विनोद गांधी, उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे, सचिव रविंद्र लोखंडे सर, खजिनदार राजेंद्र कप्पु, विश्वास निकम, नंदकुमार कळमकर, विठ्ठल सावळे, नितीन मोहिते, सामाजिक कार्यकर्ते दिवाण सानप, कुणबी समाजाचे विभागीय अध्यक्ष पांडुरंग सानप, पोलीस पाटील अनंत सानप, सामाजिक कार्यकर्ते मारुती भोसले, आ.पा.रा. सानप यांचा नातू प्रसाद सानप, मुख्यध्यापक प्रिया पवार, शिक्षिका रेश्मा जमादार, अंगणवाडी सेविका, पालक तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका रेश्मा जमादार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.






