शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

| चिरनेर | प्रतिनिधी |

अष्टविनायक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक घनश्याम केशव पाटील यांचा जन्मदिवस मोठे भोम येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसोबत नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या 55 शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच खाऊचे देखील वाटप करण्यात आले.

यावेळी चिरनेरगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, इंटेकचे राजेंद्र भगत, किशोर केणी, मनोज ठाकूर, शाम पाटील, समाधान पाटील, सुमित पाटील, सर्वेश पाटील, मुख्याध्यापिका सुनीता मॅडम, अंगणवाडी सेविका अपर्णा पाटील, प्रेरणा पाटील, स्वराज पाटील, नामदेव बरतोड, तसेच अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version