| चिरनेर | प्रतिनिधी |
शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील पिरकोन येथील राजिप प्राथमिक शाळेत शेकाप तालुका चिटणीस रवी घरत यांच्या सौजन्याने शुक्रवारी (दि.19) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्या प्रारंभी गावंड, रवी घरत, माजी सरपंच चंद्रशेखर पाटील, लाल ब्रिगेडचे अध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, शेकाप गाव अध्यक्ष हनुमंत म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव गावंड, इंग्लिश मीडियम स्कूल पिरकोनचे चेअरमन अनंता गावंड, माजी सरपंच रमाकांत जोशी, माजी सरपंच हरेंद्र गावंड, महिला आघाडी अध्यक्षा समता गावंड, महिला प्रतिनिधी बेबी गावंड, पिरकोन ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य निखिल गावंड, शाळा व्यवस्थापन कमिटीच्या रेशमा गावंड, सुप्रिया गावंड, श्रद्धा पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.






