मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील एसटी स्थानक येथून प्रवासी सेवा देणार्‍या जय मल्हार रिक्षा चालक सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून वीटभट्टी वर चालविल्या जाणार्‍या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.जय मल्हार रिक्षा चालक- मालक सेवाभावी संस्था या संघटनेकडून नेरळ ते कळंब तसेच नेरळ ते पिंपळोली, नेरळ ते देवपाडा आणि नेरळ ते कशेळे या रस्त्यावर असलेल्या प्रवाशाना सेवा दिली जाते. या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दामत येथील दहा वीटभट्टी वर काम करणारे स्थलांतरित आदिवासी विद्यार्थी यांची शाळा चालविली जाते. या शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप जय मल्हार रिक्षा संघटना यांच्याकडून देण्यात आले. यावेळी श्रावण जाधव, भगवान जामघरे,अनिल मते, प्रदीप गवळी, अंकुश बाबरे, भाविका जामघरे उपस्थित होते.

Exit mobile version