| माथेरान | वार्ताहर |
मिशन माथेरान सोशल ग्रुपच्यावतीने माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
मिशन माथेरान सोशल ग्रुपच्या पुढाकाराने तसेच मुंबई लायन्स क्लब, रोटरी क्लब चेंबूर, श्री हरिहरपुत्र भजन समाज यांच्या मदतीने माथेरानमधील नगरपरिषद प्राथमिक शाळा, शांताराम यशवंत गव्हाणकर शाळा व सेंट झेवियर हायस्कूल शाळा अशा तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मिशन माथेरान सोशल ग्रुपचे आमूधन तामिळ, प्रवीण सकपाळ, किरण चौधरी, चंद्रकांत जाधव, आकाश चौधरी, दिपक शहा, राजेश चौधरी, संदिप कदम, प्रदिप घावरे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.







