। पाताळगंगा । वार्ताहर ।
शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये, तसेच पालकांचा मुलांवरील शिक्षणांचा खर्च कमी व्हावा, या उदात्त विचारातून रायगड जिल्हा परिषद शाळा कारगाव येथील विद्यार्थ्यांना दप्तर तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्याचबरोबर तुकसई येथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मोफत औषधे देण्यात आली. हे दोन्ही उपक्रम एटीजी सामजिक संस्था, बिलियन हार्ट बिट्टींग, अपोलो हॉस्पिटल यांच्या सहकार्याने डॉ. विश्वासराव गिरी, अश्विनी गिरी यांच्या माध्यमातून पार पडले.
गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवित असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम ही संस्था करीत आहे. दरम्यान, आरोग्य तपासणीला यावेळी ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद पाहावयास मिळाला. विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना केलेल्या सहकार्यामुळे या सामजिक संस्थेचा ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. आपण प्रत्येक वेळी सहकार्य करण्यास तयार असल्याचे डॉ. गिरी यांनी सांगितले. यावेळी अपोलोचे सहकारी, परेश सर, राजिप शाळा कारगाव मुख्याध्यापक राजेंद्र दुर्गे, तुकसई ग्रामस्थ म्हणून सुनील सर, रोहित पाटील उपस्थित होते.