। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील नावलौकीक असलेल्या खैराळे येथे जय हनुमान मित्र मंडळ खैराळे व मुंबईकर मित्र मंडळाच्यावतीने खैराळे धावीर मंदीर सभागृहात गणपती उत्सवाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी, युवक, युवती, शिक्षक, सामजिक, कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरचा गुणवंत विद्यार्थी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत परेश सकपाळ, शशिकांत गंभे, रामचंद्र सकपाळ, शरद गंभे, नरेंद्र सकपाळ, गोपीनाथ गंभे, किशोर गंभे, दीपक गंभे, योगेश गंभे, रामचंद्र गंभे, मधुकर सावंत, शैलेश सकपाळ, मेघा सावंत, मितेश गंभे, अनिल गंभे, सुरेश गंभे आदी मान्यवर विद्यार्थी सत्कारमूर्ती तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच त्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप त्याच बरोबर सामजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे नागरिकांचा सन्मान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गंभे यांनी केले तर प्रास्तविक माजी अध्यक्ष सुधीर सावंत यांनी मंडळाचे सचिव यांनी मान्यवाराचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.







