विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप

| महाड | प्रतिनिधी |
काळभैरवनाथ फाऊंडेशन पुणे संस्थेच्या वतीने महाड तालुक्यातील राजिप शाळा बोरगाव व पोलादपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पैठण शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच राजेश पवार यांनी आईच्या स्मरणार्थ पाच महापुरुषांच्या फोटोफ्रेम शाळेला भेट दिल्या.

यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक विकास शिंदे, अजय कदम, अध्यक्ष अजित कदम, कार्याध्यक्ष नितीन निकम, संपर्कप्रमुख अनंत जाधव, मार्गदर्शक रामदास सुर्वे, सुरेश सकपाळ, राजेश पवार, संतोष सावंत, दीपक कदम, संतोष कदम व पैठण मुंबई मंडळाचे अध्यक्ष दिलीप मोरे आणि शाळेचे विष्णू सावंत, गोपाळ सावंत, राकेश सावंत, मुख्याध्यापक पांडुरंग मोरे, राजिप बोरगाव शाळेच्या मुख्याध्यापिका खेडेकर मॅडम, मंगल पवार, अनेक महिला व पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन दिलीप मोरे यांनी केले.

Exit mobile version