गरजुंना शैक्षणिक साहित्याचे वाटप

। रसायनी । वार्ताहर ।

वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्था रायगड यांच्या माध्यमातून गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून मोफत बाल संस्कार वर्गाची सुरुवात करण्यात आली. हिरामण कोकणे, सुमन कोकणे, आशा कोकणे, आशा राणा, कल्पना वाणी, भविणकुमार राणा, डॉ. विजय कोकणे, डॉ. जयेश वाणी, प्रतीक्षा चव्हाण या विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम राबिवले जाणार आहेत. या कार्यासाठी समाज बांधवांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आशा कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली.

तसेच, वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या घटना उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून व सेवाभावी उपक्रमांसाठी अंबिका स्टेशनरी अलिबाग, रॉयल मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, जनशिक्षण संस्थान रायगडचे पदाधिकारी डॉ. मेधा सोमैया, डॉ. नितीन गांधी, नरेन जाधव, रत्नप्रभा बेल्हेकर, भरत तन्ना, सचिन चव्हाण, उज्वला चंदनशिव व समस्त व्यवस्थापन मंडळाचे विशेष सहकार्य सातत्याने लाभले आहे.

Exit mobile version