| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील वानिवली गावातील 120 महिलांना इलेक्ट्रिक इन्फ्रारेड इंडक्शनचे वाटप करण्यात आले. त्यामुळे येथील महिलावर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
इराण अमेरिका युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाल्याने रसायनी परिसरात अपुरा पुरवठ्यामुळे गृहिणींना स्वयंपाक करताना अडचणी येत आहेत. त्यासाठी वडगाव वाशिवली गावाजवळ असणाऱ्या फ्रिनस्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा विशेष अगरवाल यांच्या सहकार्याने सिएसआर फंडातून इलेक्ट्रिक इन्फ्रारेड इंडक्शनचे 120 महिला कुटुंबांना वाटप करण्यात आले. यावेळी कंपनी युनिट हेड जितेंद्र तिवारी, प्लांट हेड तुषार तळेकर, अक्षय यादव, मेंटेनन्स हेड कौशिक पाल, एचआर हेड अनिल जांभळे, माजी सरपंच सुनील थोरवे आदींसह मान्यवर उपस्थित होते. गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वानिवलीत गृहिंणींना स्वयंपाक करणे कठीण झाले होते. त्यातच इलेक्ट्रिक इन्फ्रारेड इंडक्शन शेगडी मिळाल्याने महिलांनी फिनस्टार ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आभार मानले.







