शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप

कृषी विभागाकडून शेतीपूरक व्यवसायास प्रोत्साहन

| तळा | वार्ताहर |

कृषी विभाग व आत्मामार्फत तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या विशेष प्रयत्नातून 14 शेतकरी बांधवांना सात हजार रोहू व सात हजार कटला या जातीचे बोटुकली मत्स्यबीज वाटप तळा तालुका कृषी अधिकारी आनंद कंबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

तळा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे. परंतु, सदर शेततळ्यांचा वापर शेतीच्या पाण्याची गरज भागवणे इतपर्यंतच सिमित होता. यामध्ये बदल करण्यासाठी व शासनाचा शेती व शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व आर्थिक स्तर उंचावणे हा मुख्य हेतू नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप केले. यानंतर मत्स्यबीजाचे संगोपन व संवर्धन कसे करावे, त्यांना खाद्य कोणते व कसे द्यावे, याविषयी विस्तृत माहिती आनंद कांबळे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, कृषी अधिकारी सुनील गोसावी, आत्मा बीटीम सचिन लोखंडे व कृषी सहायक, कार्यालय कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version