आदिवासींना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण | वार्ताहर |
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी विभागातील पात्र लाभार्थींना मिळणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेंतर्गत संपूर्ण उरण तालुक्यातील एकूण 855 लाभार्थी कुटुंब असलेल्या आदिवासीवाड्यांवर दिल्या जाणार्‍या अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या मटकी, चवळी, हरभरा, पांढरा वाटाणा, तूरडाळ, उडीदडाळ, मिर्ची पावडर, गरम मसाला, मीठ, साखर, शेंगदाणा तेल, चहा पावडर या वस्तूंच्या किटच्या वाटपाचा शुभारंभ शनिवारी उरण तालुक्यातील वेश्‍वी आदिवासी वाडीवरील आश्रमशाळेत झाला. यावेळी 65 पात्र लाभार्थी कुटुंबांना खावटी वाटपाचा कार्यक्रम पार पाडला.

या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या वतीने उपस्थित अधिकारी तालुका प्रमुख दत्तात्रय पाटील, आप्पासाहेब मोरे, वेश्‍वी गावचे नवनिर्वाचित सरपंच संदीप कातकरी, रायगड भूषण राजू मुंबईकर, प्रा. राजेंद्र मढवी, शिक्षक रमणिक म्हात्रे, अनिल घरत आणि सर्व आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आदिवासी बांधवांना आधार ठरणार्‍या या खावटी योजनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Exit mobile version