चाईल्ड केअरतर्फे अन्नधान्य वाटप

| उरण | वार्ताहर |

चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरणतर्फे उरण येथील इंदिरा गांधी झोपडपट्टी व वेश्वी वाडीतील शंभर जणांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मिलिंद खारपाटील, विठ्ठल ममताबादे, रमणीक म्हात्रे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मनोज ठाकूर, ह्रितिक पाटील, तुषार ठाकूर, राजेश ठाकूर, उद्धव कोळी, निवृत्ती ठाकूर, रोशन घरत आणि विवेक कडू यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमणीक म्हात्रे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक विकास कडू यांनी केले.

Exit mobile version