मीनाक्षीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पॉकेटमनीतून अन्नधान्य वाटप ; अर्णव पाटील याचा स्तुत्य उपक्रम


आंबेपूर | वार्ताहर |
महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री तथा शेतकरी कामगार पक्षाच्या जेष्ठ नेत्या मिनाक्षीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला,हयाच वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वादशेठ पाटील व माजी आर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील यांचा धाकटा चिरंजीव अर्णव पाटील याने आपल्या वर्षभर साठवलेल्या पॉकेटमनीच्या पैशातून वाघोडे ग्रामपंचायत हद्दीतील ज्ञानवाडी येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे किट तर लहान मुलांना गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर खाऊवाटप केल्याने पाटील घराण्याच्या ह्या छोट्या शिलेदाराचे सगळीकडेच कौतुक होत आहे.
अर्णव याने सांगितले की, मागील एक वर्षांपासून मी मला आई बाबांकडून मिळालेली पॉकेटमनी साठवत होतो व शाळादेखील ऑनलाईन असल्याने माझे सगळेच पैसे शिल्लक राहत होते त्यामुळे ह्या पैशातून मी माझ्या आज्जीला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू घेण्याचे ठरवले होते पण भेटवस्तू काय घेऊ जी आज्जीला आवडेल असा विचार केल्यावर ठरवले कि आज्जीने तीच पूर्ण आयुष्य लोकांसाठी खर्ची घातलेल आहे त्यामुळे गोरगरीब लोकांना मदत करणे हीच आज्जीला सगळ्यात मोठी भेटवस्तू ठरेल म्हणून मग साठवलेल्या सर्व पैशामधून रोज लागणारे अन्नधान्य व गणपती सणाकरीता लहान मुलांना बिस्किटे, चिवडा,वेफर्स असा खाऊ विकत घेतला आणि तो इथे येऊन वाटला आहे,इकडे आजूबाजूला फिरल्यानंतर लक्षात आलं कि आतापर्यंत खुप चांगला विकास आपल्या भागात शेतकरी कामगार पक्षातर्फ झालेला असुन यानंतर सुद्धा आपल्या विभागातील सर्व समस्या सोडवण्याकरीता शेकाप मार्फत आम्ही सगळेच कायमच प्रयत्नशील राहू, सदर वाटपप्रसंगी माजी अर्थ व बांधकाम सभापती सौ.चित्राताई पाटील,पंचायत समिती सदस्या रचना थोरे,शेकाप युवानेते निलेश थोरे, वाघोडे सरपंच कृष्णा जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Exit mobile version