सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचा उपक्रम
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
आ. अनिकेत तटकरे व रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे गुरुवार, दि.23 सप्टेंबर रोजी गोवे येथील आदिवासी बांधवांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधव तसेच विविध समाजातील गरजुंना अनेक दिवसांपासून धान्याचे किट वाटप करणे हा उपक्रम सुरु असून, गोवे येथील आदिवासी बांधवांना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संदीप जाधव, गोवे उपसरपंच नितीन जाधव, सदस्य नरेंद्र पवार, सदस्या सुप्रिया जाधव, भावना जवके यांच्या हस्ते धान्याचे किट वाटप करण्यात आले.