आदिवासी कुटुंबांना धान्य व ताडपत्री वाटप

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अ‍ॅटलस कॉप्को व दीपक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने तोक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबांना मोफत धान्य व ताडपत्री वाटप करण्यात आले. त्यात अलिबाग तालुक्यातील 21 आदिवासीवाड्या मध्ये मठ्वाडी, पाठवाडी, दिवीवाडी, वळवलीवाडी, सागवाडी, गंगेचीवाडी, आंबेवाडी, रायशेतवाडी, राजेवाडी, जांभूळवाडी, खैरवाडी, पिंपळवाडी, मोरोंडेवाडी, बारशेतवाडी, सत्तेवाडी, सुडकोलीवाडी, कुसुंबळेवाडी, चिखलीवाडी, कोंझरवाडी, तळाशेतवाडी, पोयनाडवाडी यांतील 1500 कुटुंबांना धान्य वाटप तर वादळात ज्या घरांचे नुकसान झालेले आहे अशा 250 कुटुंबांना ताडपत्री वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी अलिबाग तहसील अधिकारी दळवी, महिला व बालकल्याण सदस्या चित्रा पाटील, आय. सी. डी. एस प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, अंगणवाडी सुपरवायझर उल्का कुलकर्णी, , सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी सेविका व मदतनीस, रेवदंडा कॉलेजचे मुख्याध्यापक तसेच दीपक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वय अजय आवाडे त्यांच्या सोबत मल्लेश हंचली, ओजास्विनी महाडिक, प्रीती जवरत, रोहिणी भगत, तृणाली पाटील, वैभव काटकर यांनी सहकार्य केले.

Exit mobile version