वशेणी येथे मोफत सायकल वाटप

। उरण । वार्ताहर ।
वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून, लक्ष्मी पूजनाच्या शुभमुहूर्तावर परिसरातील पाच मुलींना लेडीज सायकलचे वाटप करण्यात आले आहे. आपली दिवाळी आनंदीत जावी, प्रदुषणमुक्त जावी, पेट्रोल बचत व्हावी व सुदृढ शरीरयष्टी व्हावी या उद्दात्त हेतूने आपल्या उत्पन्नाचा वाटा समाजात पर्यत पोहोचवणार्‍या काही व्यक्तींनी पाच लेडिज सायकल वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या ताब्यात दिल्या होत्या. यांचे वितरण वशेणी गावचे माजी सरपंच प्रसाद पाटील, गावचे पोलिस पाटील दिपक म्हात्रे, समाजाभिमुख शिक्षक विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड आणि एस एस सी बॅच 1988चे प्रतिनिधी सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version