चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मोफत सायलकींचे वाटप

सीएफटीआयमुळे सावित्रीच्या लेकींना बळ- गर्गे

। रोहा । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात सीएफटीआय संस्थेने शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोफत सायकल वाटप उपक्रमामुळे सावित्रीच्या लेकींना बळ मिळाले आहे. भविष्यात देखील अ‍ॅटलास कॉप्को या कंपनीला सीएफटीआय सोबत काम करताना निश्‍चितच आनंद होईल, असे प्रतिपादन  कंपनीचे असिस्टंट मॅनेजर एचआर जितेंद्र गर्गे यांनी  सानेगाव, ता.रोहा  येथील सायकल वाटप कार्यक्रमात व्यक्त केले.


यावेळी व्यासपीठावर सीएफटीआय संस्थेच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, अ‍ॅटलास कॉप्को कंपनीचे सीएसआर मॅनेजर अभिजित पाटील तसेच विलास साळी, नेहा गुळवडे, अनिल खरात, दिनाभाई मोरे शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार म्हात्रे, गणेश मढवी, हेमंत ठाकूर, राजेश सानप, लक्ष्मण महाले यांच्यासह सानेगाव, भातसई विभागातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात आरे बुद्रुक, सानेगाव, मेढा, शेणवई या शाळांमधील 305 विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या. सीएफटीआय संस्थेने अल्पावधीतच आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कला तसेच आदिवासी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले काम तसेच ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केलेल्या कामाचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात स्वागत केले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात संस्थेच्या माध्यमातून 17 हजार सायकल वाटप करण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातून सायकल उपलब्ध झाल्याने आमचा शाळेत जाण्याचा वेळ वाचणार असून पैशांची देखील बचत होणार आहे असे विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात सांगितले.

Exit mobile version