जासई हायस्कूलमध्ये मोफत वह्या वाटप

। उरण । वार्ताहर ।
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज, जासई येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील अरुण जगे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमासाठी मधुकर पाटील, गोपीनाथ म्हात्रे, योगिता म्हात्रे अरुणा घरत,घरत टी. टी.मॅडम,अमृत ठाकूर तसेच विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचलन नुरा शेख यांनी तर आभार प्रदर्शन मयुरा ठाकूर यांनी केले.

Exit mobile version