रिटघर येथील नागरिकांना मोफत ई-श्रमकार्ड वाटप

आ. बाळाराम पाटील, प्रीतम म्हात्रेंसह मान्यवरांची उपस्थिती

पनवेल | प्रतिनिधी |
जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल सामाजिक संस्था व सुभाष भोपी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने रिटघर येथे नागरिकांना मोफत ई-श्रमकार्ड बनविण्याच्या कार्याचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील, जे.एम. म्होत्र चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, सुभाष भोपी, राजू मुंबईकर, राजेश केणी, भारत भोपी यांच्या हस्ते करण्यात आले.
ई-श्रमकार्ड बनवून देण्याच्या सत्कार्यामुळे काबाड-कष्ट करणार्‍या नागरिकांना आणि श्रमजीवी आदिवासी बांधवांना त्यांच्या भविष्यात त्यांना अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेता येईल. सोबतच अपघाती विमा पॉलिसीच्या माध्यमातून जर एखाद्या कार्डधारक नागरिकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांचा पीएमएसबीवाय विमा कव्हर मिळेल आणि एखाद्या कार्डधारकाला अंशतः अपंगत्व आल्यास त्या अपघातग्रस्त विमाधारकास एक लाख रुपयांचे विमा कव्हर मिळणार आहे.

Exit mobile version