मुलांना मोफत हेल्मेट वाटप

| खोपोली | प्रतिनिधी |

श्री छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वावोशी या ठिकाणी सहयोग फाउंडेशन, पनवेल व लोंबार्ड च्या वतीने विद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मोफत हेल्मेट चे वाटप करण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून लोकउपयोगी कार्यक्रम जसे की ग्रामविकास, स्कूलकिट, विदयार्थी विकास शिष्यवृत्ती, बुक बँक, फिरती विज्ञान प्रयोगशाला, कमुनिटी नॉलेज हब, अभ्यासिका आणि राईट टू सेफ्टी अश्या खूप सार्‍या प्रकल्पावर काम करत आत्ता पर्यंत अशा प्रकारे पालक आणि त्यांचे पाल्य यांना आतापर्यंत 31000 हेल्मेट वाटप करण्यात आले आहे. त्या मध्ये पेण, पनवेल, वरसई, वावोशी, वडखळ, नवी मुंबई, ठाणे, मुंबई वढावं, कर्जत, मुरबाड, अकोला अश्या बर्‍याच शाळांमध्ये मुलांना आणि त्यांच्या पालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले आहे. असल्याचे जयश्री सानप यांनी सांगितले, त्यावेळी माधवी पाटील, सुरज शिंदे, लक्ष्मी माळी, गणेश संसारे व रेश्मा सोनवणे हे सेवा सहयोग फाउंडेशन चे प्रतिनिधी उपस्थित होते.

यामार्फत शून्य अपघात या धोरणानुसार दुचाकी वरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर डी गावित साहेब यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधन केले, त्यांनी दुचाकी वरील प्रवास करताना घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर जोपर्यंत दुचाकी वाहन परवाना मिळत नाही. तोपर्यंत कोणीही विद्यार्थी गाडी हातात घेणार नाही. या संबंधीच्या सूचना पालकांना दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सोमनाथ मोरे सर, श्री विजय ठाकरे सर, ज्युनियर कॉलेजचे इनचार्ज प्रा प्रशांत शेळके सर, श्री समीर मोमीन सर व श्री मुकेश कोकणी सर, पालक प्रतिनिधी म्हणून श्री संतोष शेवाळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील कडव सर यांनी केले.

Exit mobile version