विद्यार्थ्यांना मोफत ओळखपत्राचे वाटप

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने वेश्वी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी लांगी, शाळेतील शिक्षक निर्मला शिरसाठ, नरेश गायकवाड, रवींद्र साळुंखे व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version