| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनची सभा अलिबाग-नागाव बायपास मार्गावरील जलाराम मंदिरात पार पडली. रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेत मागील कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.
यामध्ये सर्वानुमते समीर मालोदे यांची अध्यक्षपदी, तुषार थळे यांची उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष म्हणून सुदेश माळी, विकास पाटील यांची सचिवपदी, विवेक पाटील यांची खजिनदारपदी, तर सुरेश खडपे आणि राकेश दर्पे यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली.
अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबीर असे अनेक उपक्रम राबविले असून, ते काम या कार्यकारिणीसह पुढे नेण्यात येईल, असे मालोदे यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष सचिन असराणी, अमोल नाईक, सचिन म्हात्रे, अभिजित काटकर, विजय पाटील, प्रमोद कांबळी, अमर मढवी, मनोज पाटील, विराज घरत, वैभव वाणी, जयेंद्र वाघमारे, सागर सावंत, प्रणेश म्हात्रे उपस्थित होते.