। पनवेल । प्रतिनिधी ।
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उध्दव ठाकरे) तर्फे खारघर सेक्टर-12 मधील गिरीजा वृध्दाश्रम आणि अनाथ आश्रमामध्ये फळवाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शिवसेना खारघर शहर समन्वयक रामचंद्र देवरे, नंदू वारुंगसे, उत्तम मोर्बेकर, प्रशांत जांभूळकर यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर रोजी 13वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्त शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी खारघर मधील शिवसैनिक एकत्र जमले होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी खारघर सेक्टर-12मधील ‘गिरीजा वेल्फेअर असोसिएशन’च्या वृध्दाश्रमात वास्तव्यास असलेल्या वृध्द व्यक्ती तसेच अनाथ आश्रमातील मुलांना फळे वाटप करुन उपस्थित मुलांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी गुरुनाथ म्हात्रे, आप्पा वारंग, आनंद व्हावळ, संजय कानडे, पांडुरंग घुले, ॲड. जयसिंग माने, सचिन गोरे, संतोष कट्टीमणी, सचिन सावंत, दर्शन वळंजू, निलेश गायकवाड यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृध्दाश्रमात फळांचे वाटप

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606