| नेरळ | वार्ताहर |
कर्जत येथील राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वृद्धाश्रमात फळे आणि खाऊचे वाटप करून साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे कार्यकर्त्यांनी वांजळे येथे असलेल्या हॅप्पी फ्लोक फाऊंडेशनमध्ये जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त तेथील वृध्द नागरिकांना फळे वाटप केली. यावेळी जिजाऊ फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. पूजा सुर्वे, रेखा देशमुख, पायल लांगि, मनीषा पवार, पल्लवी कनोजे, कांचन देशमुख, पांकेश जाधव, दिव्यांशू सुर्वे आदी उपस्थित होते.