| माथेरान | वार्ताहर |
गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू झाली आहे. गणरायाचे आगमन आता काही तासांवर आले आहे. उत्सवकाळात सर्वत्र महागाई वाढत असताना माथेरान शहर भाजपकडून गणेशभक्तांना थोडा दिलासा दिला आहे. ज्या गणेशभक्तांकडे गणेशाचे आगमन होणार आहे, अशा गणेशभक्तांना गणेश पूजनसाहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते. शनिवार (दि.16) रोजी डीवाईन कलेक्शन येथे हे वाटप करण्यात आले. अठरा प्रकार असलेले पूजन साहित्य वाटप करण्यात आले. याचा फायदा 120 परिवारांना मिळाला आहे.यामध्ये दीड दिवस 34,पाच दिवस 67,सात दिवस 1 आणि दहा दिवस 18 गणपती असणार आहेत. माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ,उपाध्यक्ष किरण चौधरी,माजी नगरसेवक प्रदीप घावरे,चंद्रकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते मनोहर रांजाणे,माजी शहराध्यक्ष विलास पाटील,बाबू बर्गे,वसंत कदम यांच्या हस्ते पूजनाचे साहित्य वाटप करण्यात आले.