गणेशोत्सवासाठी काही तास शिल्लक असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. विविध प्रकारचे मखर, आकर्षक फुले, पूजा साहित्य आदींनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. दहा दिवसांच्या या उत्सवात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध स्पर्धादेखील आयोजित करण्यात आल्या आहेत. चाकरमानीसुद्धा मोठ्या संख्येने गावाकडे दाखल होत असून, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
बांबूच्या मखरांची गणेशभक्तांना भुरळ
| पाताळगंगा | वार्ताहर |

बांबूपासून विविध प्रकारे नक्षीकाम करुन मखर तयार करुन विक्रीस ठेवण्यात आली आहेत. तीन ते दहा हजारांपर्यंत त्याची विक्री करण्यात येत आहे. चौक येथील कारागीर शेळके यांनी याबाबतची माहिती दिली.यावर्षी बाजारपेठेत नक्षीकाम केलेल्या बाबूपासून डायमंड विको फ्रेंडलीची रेडीमेड मखर उपलब्ध झाली असून, गणेशभक्तांच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असल्याचे श्री. शेळके यांनी सांगितले. उत्तम कलाकुसर व उत्तमरीत्या सजवलेली ही मखर भक्तांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरत असून, मागणीनुसार ऑडर स्वीकारली जात असल्याचे व्यावसायिक शेळके यांनी सांगितले. विविध प्रकारचे आकर्षक देखावे व गणरायाला साजेशी सजावट करण्यावर भाविकांचा भर असल्याने विविध प्रकारच्या मखरांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सवाला अवघे काही तासांचा अवधी असताना तयारीला उधाण आलेले असून, वेळीची बचत व्हावी या उद्देशाने तरुणाई आज प्रत्यक्ष कलाकुसर करण्यापेक्षा रेडिमेड मखरांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
मोहोपाडा बाजारपेठ सजली
| रसायनी | वार्ताहर |

गणरायाच्या स्वागतासाठी मोहोपाडा बाजारपेठ सज्ज झाली आहे. बाजारपेठ आता रंगीबेरंगी वस्तूंनी फुलली असून, ठिकठिकाणी विविध आकाराच्या आरास तसेच बाप्पाच्या मूर्तीची दुकाने लागल्याचे दिसते. बाजारपेठेत आरासीला लागणारे विविध साहित्य उपलब्ध आहे. गणेशोत्सवात नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, नारळही मोठ्या प्रमाणात विक्रीस आहेत. मोहोपाडा शिवाजी चौकातील माळी यांच्या दुकानात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी विविध साहित्य आल्याने दुकानासमोर लावलेल्या लांबलचक फुलमाला आकर्षण ठरत आहे.
पूजेसाठी गुरुजींना वाढती मागणी
| पाताळ्गंगा | वार्ताहर |
लाडक्या गणरायाचे यथोचित स्वागत आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार प्रतिष्ठापनेसाठी गुरूजींना निमंत्रित करण्याची प्रथा आहे. ऑनलाइन पूजेच्या अनेक वेबसाइट; एवढेच नव्हे तर मोबाइलवर ॲप्लिकेशन उपलब्ध असतानाही, भक्त गुरूजींकडून गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घेत असल्यामुळे दिवसभराच्या अपॉइंटमेंट फुल्ल झाल्या आहेत, असे मत नडोदे येथील जंगम यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
गेल्या आठवड्यापासूनच गुरूजींना प्रतिष्ठापनेच्या बुकिंगसाठी फोन सुरू झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत एकत्र कुटुंबपद्धती असल्याने सगळ्या भावंडांत मिळून एकच घरी गणपती बसत असे. अलीकडे प्रत्येक भाऊ वेगवेगळा राहात असला तरीसुद्धा या गणपतीच्या सणांच्या निमित्ताने एकत्रितपणे येऊन घरात गणेशोत्सव साजरा होतो आहे. गुरुजींनी पूजा केल्यास घरामध्येही भक्तीमय, मांग