खारिकवाडा पूरग्रस्तांना शेकापतर्फे वस्तूंचे वाटप

| मुरूड | वार्ताहर |
अकरा जुलै रोजी मुरुड तालुक्यात ढगफुटी होऊन आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नांदगाव जवळील खारिकवाड्यातील सुमारे अडीचशे पूरग्रस्तांना शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते नृपाल पाटील व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
खारिकवाड्याच्या मारुती मंदिरात मुरुड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते.,जिल्हापरिषद सदस्या राजश्रीताई मिसाळ,नरेश कुबल,विजय म्हात्रे,उदय थळे,अविनाश शिंदे,तसेच शेकापचे अजित कासार,शरद चवरकर,राहिल कडू,रिजवान फहिम,विद्याधर चोरघे,युवराज नृपाल पाटील,मनिष नांदगावकर आदींच्या हस्ते हे वाटप करण्यातआले.याततांदुळ,मसाला,कांदे ,बटाटे,तेल,साखर,बिस्किटे,डाळी आदींचा समावेश होता.यावेळी गावातील दामोदर राऊत,गोरख कुमरोटकर,अरविंद शेडगे;शरद कुमरोटकर,विनोद मेस्त्री, केतन मांदाडकर,सागर राऊत आदी उपस्थित होते.

Exit mobile version