| खांब | प्रतिनिधी |
संगाथ प्रकल्पांतर्गत रोह्यातील सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेच्यावतीने व दिपक फाऊंडेशनच्या सहकार्याने शनिवारी (दि.4) नेहरू नगर शाळा क्र. 8 मध्ये दिव्यांगासाठीच्या विविध शासकीय योजनांचे कार्ड वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
दिपक फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक प्रविण ठोसर यांच्या सहकार्याने पर्यवेक्षक अपेक्षा केतन खारिवले व रसिका करण माने यांच्या सहयोगाने दिव्यागांच्या हिताच्या विविध शासकीय योजनांचे लाभ घेण्याकरिता लागणारे आयुष्मान भारत, आभा कार्ड, आधार कार्ड केवायसी, दिव्यांग व्यक्तीची ऑनलाइन यूडीआयडी केवायसी या योजनांचे ऑनलाइन विनामूल्य अर्ज करून मोफत कार्ड वितरण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल 86 लाभार्थ्यांनी उत्फूर्तपणे सहभाग दर्शवून लाभ घेतला. यावेळी सहयोग अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता, सेक्रेटरी रमेश खराडे, कोषाध्यक्ष संजय टी टी., सल्लागार किरण मोहिते, सहकोषाध्यक्ष निवृत्ती सुर्वे, सदस्या जयश्री पुजारी, वैशाली पवार आदींसह दिव्यांग व्यक्ती व नागरिकांनी उपस्थिती होते.







