| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील लायन्स क्लब माणगावच्या 2025-26 या वर्षासाठीच्या नवीन संचालक मंडळाचा प्रमाणपत्र प्रदान, सदस्य नोंदणी आणि पदग्रहण सोहळा 30 सप्टेंबर रोजी पार पडला. हा समारंभ माणगाव येथील हॉटेल उत्सव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवीन संचालक मंडळामध्ये संदीप नागे यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली.
लायन्स आंतरराष्ट्रीय जिल्हा 3231 ए 4 च्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात लायन्स क्लब पोयनाड या प्रायोजक क्लबच्या उपस्थितीत ‘प्रकाशमय व्हा’ या संदेशासह नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी जिल्हा प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, प्रथम उप प्रांतपाल प्रवीण सरनाईक, व्दितीय उप प्रांतपाल विजय गणत्रा, माजी प्रांतपाल अनिल जाधव, क्षेत्र समन्वयक प्रिया पाटील, क्षेत्राध्यक्ष गिरीश म्हात्रे, जिल्हा जीएसटी समन्वयक प्रदीप सिनकर, प्रियदर्शिनी पाटील आणि विभाग प्रमुख सुस्मिता सित्यालकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष गुरुनाथ माळी यांसारख्या अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी सर्व लायन्सने पुढील वर्षासाठी सेवाकार्याची शपथ घेतली. जिल्हा प्रांतपाल संजीव सूर्यवंशी यांच्या हस्ते मुख्य अतिथी आणि पदग्रहण अधिकारी म्हणून, तर प्रथम उप प्रांतपाल प्रवीण सरनाईक यांच्या हस्ते नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. नवीन संचालक मंडळामध्ये संदीप नागे यांनी अध्यक्षपदाची, प्रणल घाग यांनी प्रथम उपाध्यक्षपदाची, विनायक टेटगुरे यांनी सचिवपदाची आणि अमोल जंगम यांनी कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. याशिवाय, मिहीर फोंडके, गणेश काळे, निलेश थोरे आणि सुरेश मोहिते यांच्यासह अन्य पंधरा संचालकांनी आपापल्या पदाची सूत्रे हाती घेतली.





