माणगाव नगरपंचायतीतर्फे अनुदानाचे वाटप

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील पाच टक्के निधी राखीव अंतर्गत दिव्यांगत कल्याणासाठी अनुदान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वैयक्तिक शौचालय अनुदान लाभ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शुक्रवार (दि.22) रोजी अनुदानाचे वाटप करण्यात आले.
माणगांव नगरपंचायत हद्दीतील 93 लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकूण 4 लाख 65 हजार रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले. सदर लाभार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय हप्ता असे 2 लाख 40 हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. या लाभार्थ्यांना अनुदानाचे धनादेश वाटप करताना राजिपचे माजी सभापती अ‍ॅड.राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, महिला व बालकल्याण समिती सभापती शर्मिला सुर्वे, स्वच्छता व आरोग्य सभापती अजित तारळेकर, पाणी पुरवठा सभापती राजेश मेहता, नगरसेवक कपिल गायकवाड, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे, नगरसेविका नंदिनी बामगुडे, नगरसेविका रिया उभारे, नगरसेविका हर्षदा काळे, नगरसेविका सुविधा खैरे, नगरसेविका रश्मी मुंढे, नगरसेविका ममता थोरे आदी मान्यवरांसह लाभार्थी उपस्थित होते.

Exit mobile version