। नागोठणे । वार्ताहर ।
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील रामनगर भागातील सुमारे 100 रहिवाशांना दिवाळीच्या निमित्ताने गृहोपयोगी अशा चादर, चटई, बालदी, प्लास्टिक टेबल, प्लास्टिक मग आदी भेटवस्तूंचे वाटप राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर जवके, मधुकर महाडिक, नितीन पत्की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सुजाता जवके, नागोठणे विभाग अध्यक्षा स्नेहल काळे, शहर उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे आदी मान्यवर उपस्थित होते.