| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड फोटोग्राफर्स ॲन्ड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे यांच्या हस्ते या ओळखपत्रांचे वाटत करण्यात आले. यावेळी रायगड फोटोग्राफर्स ॲन्ड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी लांगी, शाळेतील शिक्षक निर्मला शिरसाठ, नरेश गायकवाड, रवींद्र साळुंखे व विद्यार्थी उपस्थित होते.







