आदिवासी बांधवांना दिव्यांचे वाटप

| माणगाव | प्रतिनिधी |

दिवाळीचा सण हा गोड व आनंदित साजरा व्हावा या हेतूने माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने शुक्रवारी (दि.17) आदिवासी बांधवांसाठी ‌‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत फराळ व दिव्यांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आयोजन हे दरवर्षी सातत्याने करत असते. यामध्ये समाजपयोगी उपक्रम हे सातत्याने राबविले जातात. या सातत्यपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम. खामकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. नेहा तुराई व स्वप्निल सकपाळ यांनी आदिवासी बांधवांना फराळ व दिव्यांचे वाटप केले. त्याकरता राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व समिती सदस्यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version