| माणगाव | प्रतिनिधी |
देगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिनेश नथुराम गुगळे यांच्यातर्फे व देगाव शाळेचे शिक्षक शंकर दत्ताराम शिंदे यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील दहिवली केंद्रातील 10 शाळांना कुमशेत येथे दहिवली केंद्राच्या शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख अजय पाटील यांच्या हस्ते प्रथोमचार पेटी वाटप करण्यात आल्या. केंद्रातील दहिवली (मराठी), देगाव, कुमशेत, वडवली कोंड, शिरवली, शिरवली आदिवासी वाडी, देगाव आदिवासी वाडी, तारणे, कुशेडे, दहिवली कोंड या दहा शाळांना देगावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश गुगळे यांच्यातर्फे व पदवीधर शिक्षक शंकर शिंदे यांच्या प्रयत्नांनी प्रथमोपचार पेटी वाटप करण्यात आल्या. सदर कार्यक्रमास दहिवली केंद्रातील सर्व शाळांचे मुख्यध्यापक,पदवीधर शिक्षक व सहकारी शिक्षक वृंद उपस्थित होते.