महावितरणतर्फे उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण

मुंबई | प्रतिनिधी |
महावितरणच्या भांडूप परिमंडलात मअभियंता दिवसफ उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भांडूप परिमंडलातील अभियंतांना त्यांच्या कामगिरीबद्दल मउत्कृष्ट अभियंताफ पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर होते. यासोबतच कार्यक्रमात ठाणे मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, सहाय्यक महाव्यवस्थापक हविषा जगताप, तिन्ही मंडळातील अभियंते व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता (प्रशा), देवेंद्र उंबरकर यांनी केले.
उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित अभियंत्यांमध्ये कार्यकारी अभियंता सहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम प्रणाली विश्‍लेषक – रामकृष्ण वराडे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता: सादेकपाशा चांदपाशा इनामदार, उमेश लेले. उपकार्यकारी अभियंता : महेंद्र वाकपैजण, अनिल जगजाप. सहाय्यक अभियंता : मंगेश राजगे, तुळसीदास तेले, शैलेश पवार, श्रुतिका वेर्णेकर, भारत कदम, योगेश सोनावणे, अतुल दिघे, भाग्यश्री कदम, रणजीत देशपांडे, सिद्धार्थ बंड कनिष्ठ अभियंता: वैभव डफाळ, वर्षा मगर, अनंतकुमार मकनिकर आदींचा समावेश आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी अभियंत्यांना प्रोत्साहन देत संबोधित केले

Exit mobile version