| चिरनेर | प्रतिनिधी |
जे.ए. स्पोर्टस् क्रिकेट संघ खोपटे बांधपाडा यांच्यातर्फे चिरनेर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 104 किलो तांदळाचे व खाऊचे वाटप करण्यात आले. जे.ए. स्पोर्टस् क्रिकेट संघ खोपटे बांधपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने नाईट अंडरआर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून जे.ए.स्पोर्ट्स संघाला जो नफा मिळाला त्या नफ्याच्या पैशातून चिरनेर येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग ता.बार्शी, जि.सोलापूर संचलित अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. हा उपक्रम रविवारी (दि.5) पार पडला असून 200 गरीब विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







