| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक येथे प्रवाशांचे सोयी साठी बनविण्यात आलेला सरकता जिना सोमवारी (दि.6) कार्यान्वित करण्यात आला. नेरळ स्थानकातील हा दुसरा सरकता जिना आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मध्य रेल्वे वरील नेरळ स्थानकाचे मेकओव्हर करण्याचे काम सुरू आहे. या स्थानकात नेरळ स्थानकात पादचारी पूल, सरकता जिना, उद्वाहन तसेच प्रवासी निवारा शेड, स्वच्छता गृह, खानपान सेवा अशा सुविधा उपलब्ध करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. माथेरान या थंड हवेचे ठिकाणी जाण्यासाठी नेरळ येथून माथेरान जाणारी मिनीट्रेन जात असते. मुंबई- ठाणे भागातून येणारे पर्यटक फलाट क्रमांक एकवर उतरतात आणि त्यानंतर माथेरान तसेच नेरळचे विविध भागात जात असतात. ही बाब लक्षात घेऊन फलाट क्रमांक एकवर स्काय वॉक बनविण्यात आला असून, मुंबई दिशेकडे सरकता जिना कार्यान्वित झाला आहे. एकाचवेळी चढता आणि उतरता येणारा हा सरकता जिना स्थानकातील मुंबई दिशेकडे आहे. उपनगरीय लोकल स्थानकात पोहचल्यानंतर त्यावेळी माथेरान जाणारे आणि अन्य प्रवासी यांची गर्दी होत असते. अशावेळी सरकता जिना प्रवाशांना मदतगार ठरत आहे.
तर याच स्थानकात स्थानकाच्या मध्यभागी आणखी एक सरकता जिना बनविण्यात आला आहे आणि हा सरकता जिना अनेक महिन्याचे प्रतीक्षेनंतर अखेर कार्यान्वित झाला आहे. स्थानक प्रबंधक गुरुनाथ पाटील यांनी प्रथम प्रवास करीत हा सरकता जिना कार्यान्वित करण्यात आला.







