चार हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

| पाली | वार्ताहर |

संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोबिवली कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव विभागासह सुधागड तालुक्यातील चार हजार विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव विद्यालयात घेण्यासाठी माजी विद्यार्थी तथा रहिवासी सेवा संघ डोबिवली कल्याण अध्यक्ष यशवंत कदम आणि दिलीप धनावडे यांच्या प्रयत्नामुळेच शक्य झाले.

कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टच्या ए.जी.एम. खुशबू गोयल यांनी हा कार्यक्रम नांदगाव विद्यालयात घेण्याचे ठरविले त्याबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांनी विशेष आभार व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती तसेच बौद्धिक क्षमतांचा विकास होण्यासाठी पहिली ते पाचवीच्या बौद्धिक विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा, सहावी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अभियोग्यता चाचणी, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मॅजिक खेळ दाखवून त्यांचात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत केली. शाळेतील तसेच नांदगाव विद्यालयातील पाच्छापूर विभागतील असे एकूण 1200 विद्याथ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन भरघोस बक्षिसांची कमाई केली.

Exit mobile version