। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्या विद्यमाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन गुढीपाडवानिमित्त शनिवार, 2 एप्रिल रोजी लोढा हेरिटेज मैदान डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत नागशेत संघाने भार्जे संघावर बाजी मारत विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत सुधागड तालुक्यातील सोळा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कल्याण डोंबिवलीमधील सुधागड रहिवासी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. स्पर्धेतील अंतिम कबड्डी सामना नागशेत विरुद्ध भार्जे या दोन संघात झाला. या स्पर्धेचा अंतिम विजेता नागशेत, तर उपविजेता भार्जे हा संघ ठरला. तृतीय क्रमांक चिवे आणि चतुर्थ क्रमांकावर आपटवणे या संघांना समाधान मानावे लागले.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास पंधरा हजार आणि आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकास दहा हजार आणि आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ संघास प्रत्येकी सात हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आलेया स्पर्धेसाठी सुधागड रहिवासी सेवा संघ डोबिवली अध्यक्ष जयेश ठाकूर, उपाध्यक्ष महेश अधिकारी, सरचिटणीस नामदेव महाले, खजिनदार उल्हास पालांडे चिटणीस विनोद ससर तसेच मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थितीत होते