| अलिबाग | प्रतिनिधी |
6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी मुंबईने अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम “दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी योग” ही होती. या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची सर्व व्यवस्था एनसीसी युनिट जेएसएम कॉलेजने केली होती. यावेळी नाना पाटील हायस्कूल पोयनाड आणि महेंदले हायस्कूल रोहा हायस्कूलच्या कॅडेट्सनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात एकूण 160 कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. योगा सुरू होण्यापूर्वी, 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी मुंबईचे सुभेदार मेजर अमर सिंग यांचे स्वागत प्रथम अधिकारी समाधान भंडारे आणि फर्स्ट ऑफिसर संदीप चांदुळकर यांनी केले. त्यानंतर कमांडिंग ऑफिसर कर्नल नितीश पटियाल आणि प्रशासन अधिकारी कर्नल आशिष कुमार यांनी योग दिवसांची आयोजनासाठी संपूर्ण नेतृत्व केले. जेएसएम कॉलेज एनसीसी युनिटचे कॅडेट सिद्धार्थ नाईक, आणि मेहेंदळे हायस्कूलच्या कॅडेट स्पंदन केतन भोसले यांनी योग प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमात जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲड. डॉ. गौतम पाटील यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले. यावेळी जेएसएम कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






