| रोहा | प्रतिनिधी |
शहर व ग्रामीण भागात रविवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या रोहेकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दडी मारून बसलेल्या पावसाने आज अचानक हजेरी लावल्याने बच्चे कंपनीने पावसात भिजत मनमुराद आनंद लुटल्याचे चित्र पाहायला मिळत होते. पावसाच्या सरींमध्ये भिजत क्रिकेट व अन्य खेळ खेळताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. उष्णतेमुळे दिलासा देणाऱ्या या पावसामुळे लहान मुलांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मान्सून बरसल्याने शेतकरी वर्गातही समाधान व्यक्त करण्यात येत असून, आगामी पेरणीच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.







