7 चौकार, 28 षटकारांची आतषबाजी
| दोहा | वृत्तसंस्था |
अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेटविश्वाला थक्क करणारी कामगिरी केली आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत यूएईविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक झळकावले. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले. 7 चौकार आणि तब्बल 28 षटकारांच्या जोरावर त्याने 53 चेंडूंत 204 धावांची वादळी खेळी केली.
वैभवने अवघ्या 16 चेंडूंत अर्धशतक, तर 28 चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यानंतर केवळ 12 चेंडूंत दीडशतकाचा टप्पा गाठला आणि 52 चेंडूंत द्विशतक साकारले. 384.90 च्या धावगतीने फलंदाजी करत त्याने विक्रमांची मालिकाच रचली. या खेळीसह वैभवने लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज होण्याचा मान मिळवला. वयाच्या 15 वर्षे 242 दिवसांत त्याने हा पराक्रम केला. तसेच लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रमही आपल्या नावावर केला. त्याच्या या खेळीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वैभवने 28 चेंडूंत शतक झळकावताना यापूर्वीचा ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कचा 29 चेंडूंचा विक्रम मोडला. त्याआधी एबी डिव्हिलियर्सने 31 चेंडूंत, तर भारताच्या साकिबुल गणीने 32 चेंडूंत शतक केले होते.
सर्वात वेगवान शतकांचा विक्रम
28 चेंडू वैभव सूर्यवंशी (भारत-अ), 2026
29 चेंडू जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया), 2023
31 चेंडू एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), 2015
32 चेंडू साकिबुल गणी (भारत), 2025
33 चेंडू इशान किशन (भारत), 2025
सर्वात वेगवान द्विशतकांचा विश्वविक्रम
वैभव सूर्यवंशी (भारत-अ) 52 चेंडू
चाड बोव्स (न्यूझीलंड) 103 चेंडू
ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) 114 चेंडू
एन. जगदीशन (भारत) 114 चेंडू
हॅरी ब्रूक (इंग्लंड) 114 चेंडू






