• Login
Sunday, June 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?

Antara Parange by Antara Parange
June 21, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जलजीवन योजनेत गैरव्यवहाराचा आरोप
सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
ॲड. राकेश पाटील यांचा एसपी, सीईओंकडे तक्रार अर्ज

| अलिबाग | प्रतिनिधी |

चिंचोटी गावात अस्तित्वात नसलेल्या ‌‘ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती‌’च्या नावाने कागदोपत्री योजना पूर्ण दाखवून, संयुक्त प्रमाणपत्रे, नाहरकत दाखले आणि ‌‘हर घर जल‌’ प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या 76,16,345/- रुपयांच्या निधीची बिले काढण्यात आल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या समितीच्या नावाने संपूर्ण कागदोपत्री कारभार झाल्याचा दावा केला जात आहे, ती समितीच अस्तित्वात नसल्याचे ग्रामपंचायतीच्या लेखी उत्तरातून समोर आल्याचा दावा तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्याविरोधात ॲड. पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.

चिंचोटी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चिंचोटी गावामध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मात्र, योजनेचा कालावधी संपूनही ग्रामस्थांना नियमित पाणी मिळाले नाही. त्यामुळे ॲड. राकेश नारायण पाटील यांनी ग्रामपंचायत चिंचोटी तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून माहिती मागविली. मिळालेल्या कागदपत्रांनुसार संबंधित योजना डिसेंबर 2023 मध्येच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाणी मिळत नसताना योजना पूर्ण झाल्याची नोंद कशी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत ॲड. पाटील यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये तक्रारी दाखल केल्या. मात्र, रेवदंडा पोलिसांनी हा विषय जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील असल्याचे कारण देत तक्रार अर्जावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई न करता अर्ज निकाली काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर ॲड. राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अधिक माहिती व कागदपत्रे मिळविली. त्यामध्ये चिंचोटी गावात जलजीवन मिशन योजना राबविण्यासाठी “ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती” स्थापन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती, देखभाल व शंभर टक्के निगा राखण्याची जबाबदारी या समितीची असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच गावात पाणीपुरवठा सुरळीत सुरू असून, ग्रामस्थांची कोणतीही तक्रार नसल्याचे ‘संयुक्त प्रमाणपत्र’ या समितीमार्फत देण्यात आल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे. याशिवाय ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण केले असून पाणीपुरवठा नियमित सुरू असल्यामुळे अंतिम बिलाच्या रकमेबाबत समितीची कोणतीही हरकत नसल्याचे ‘नाहरकत प्रमाणपत्र’देखील जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मात्र, तक्रारदार ॲड. राकेश पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे या समितीच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतर पदाधिकाऱ्यांची माहिती मागितली असता ग्रामसेवक पी.डी. दिवकर यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली की, चिंचोटी गावात जलजीवन मिशन योजनेसाठी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन केल्याचे दिसून येत नाही. तसेच समितीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, पदाधिकारी यांची नावे किंवा समितीने घेतलेल्या ठरावांची माहिती उपलब्ध नसल्याचेही ग्रामपंचायतीने कळविल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. यामुळे अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावाने संयुक्त प्रमाणपत्रे, नाहरकत दाखले आणि अन्य कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

निहाल चवरकरांच्या प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल चवरकर यांनी चिंचोटी गावासाठी “हर घर जल” गाव प्रमाणपत्र देताना ग्रामपंचायत, कथित ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती तसेच लाभार्थी नोंदींची पडताळणी न करता अथवा प्रत्यक्ष परिस्थितीच्या विपरीत नोंदींना मान्यता दिली आहे. या प्रमाणपत्रात सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणी देण्यात आल्याचे, वितरण वाहिन्यांमध्ये कुठेही गळती नसल्याचे, सरपंच व ग्राम पाणी व स्वच्छता समिती सदस्यांसह गाव पाहणी झाल्याचे, ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फायदे समजावून सांगितल्याचे सर्व लाभार्थ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती याच्या उलट असल्याचा दावा करत ॲड. राकेश पाटील यांनी करीत निहाल चवरकर यांनी पदाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल करणारे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला आहे. हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे माहीत असतानाही ते देण्यात आल्यामुळे शासनाची फसवणूक होऊन लाखो रुपयांची बिले मंजूर होण्यास मदत झाल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
349 लाभार्थी दाखविले; त्यामध्ये 18 लाभार्थी बोगस
चिंचोटी गावामध्ये योजनेचा प्रत्यक्ष लाभ नसतानाही 349 लाभार्थी दाखविण्यात आले. विशेष म्हणजे, त्यापैकी 18 लाभार्थी बोगस असल्याचा आरोप ॲड. राकेश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे लाभार्थी नोंदणी, पोर्टलवरील माहिती आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
76,16,345/- निधीच्या अपहार आणि भ्रष्टाचाराचा आरोप
ॲड. राकेश नारायण पाटील यांनी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीनुसार अस्तित्वात नसलेल्या चिंचोटी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अस्तित्व कागदोपत्री दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली असून शासनाच्या 76,16,345/- (शहात्तर लाख सोळा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये) निधीचा अपहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन सरपंच बिंदिता बाबुराव पाटील ग्रामसेवक पी.डी. दिवकर, झाद इंटरप्रायझेसचे मालक साईम झुबेरखान देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल चवरकर यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जासोबत ॲड. राकेश नारायण पाटील यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे.

चिंचोटी ग्रामपंचायतीतील जलजीवन मिशन प्रकरण हा केवळ एक नमुना आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या-ज्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या योजना राबविण्यात आल्या आहेत, त्या अनेक गावांमध्ये बिले काढूनही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागातील महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कागदोपत्री ‌‘हर घर जल‌’ आणि प्रत्यक्षात पाण्यासाठी वणवण अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.

– ॲड. राकेश नारायण पाटील, तक्रारदार

Related

Tags: adv. rakesh patilalibagalibag newschinchotichinchoti newsindiajal jeevan missionkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर
कर्जत

उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर

June 21, 2026
रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प
पर्यटन

रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प

June 21, 2026
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा
अलिबाग

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा

June 21, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन
sliderhome

उद्यापासून पावसाळी अधिवेशन

June 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सिडको कार्यालयातून संचिका चोरीला

June 21, 2026
रोह्यात पावसाची हजेरी
sliderhome

रोह्यात पावसाची हजेरी

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?