देहेनच्या संतोष जुईकर यांची 19 वर्षे देशसेवा
। भाकरवड । जीवन पाटील ।
अलिबाग तालुक्यातील देहेन गावचे सुपुत्र हवालदार संतोष बाळकृष्ण जुईकर हे भारतीय सैन्यदलात भारतमातेच रक्षण करीत होते. त्यांनी सैन्यदलात प्राणाची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचे 19 वर्षे रक्षण केले. ते आज भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परत आले. त्यावेळी देहेन गावच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करती वाजतगाजत पांडवादेवी गावच्या सरहद्दीवरून मिरवणूक काढून सपत्नीक सत्कार केला. यावेळी पंचक्रोशितील हजारो नागरिका उपस्थित होते. ‘जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता की जय’, अशा घोषणा देत सारा परिसर दुमदुमून गेला होता.
ही मिरवणूक पांडवादेवी मार्गस्थ भाकरवड, देहेन तेथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न होत, विधीवत पूजन ओवाळणी करून यावेळी संतोष जुईकर, पत्नी याचे आई वडील , भाऊ बहीण असे संपूर्ण परिवार रथात विराजमान झाले होते.
या कार्यक्रमासाठी निवृत्त कर्नल अरूण नायगम, कुर्डुस येथील निवृत्त हवालदार आशीर्वाद पाटील, कुमार कुथे लान्स हवालदार चोले, हिराचंद्र कोठेकर हवालदार गडब, कमलाकर गायकवाड हवालदार, दीनानाथ टेमकर नायक कमळपाडा, नितीन पाटील नायक कमळपाडा, शेखर टेमकर नायक कमळपाडा, योगेश पाटील कमळपाडा हवालदार , सुनील पाटील मेढेखार एसीपी हवालदार, वैभव पाटील हवालदार कमळपाडा, सुनील पाटील पेण सीएमपी, मुरलीधर पाटील धामणपाडा हवालदार, मयुरेश पाटील धाकटे शहापूर, मिलिंद बोचरे पेण माजी सैनिक सचिव, हरिश्चंद्र कोठेकर शिपाई, दिनेश भोईर वाघ्रण नायब सुभेदार, केतन भोईर जांभुळ टेप हवालदार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन, तसेच गणेशाच्या प्रतिमेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ संतोष जुईकर यांचे वडील बाळकृष्ण जुईकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश डाकी कोलेटी व रवींद्र पाटील भाकरवड यांनी केले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर मंडळी यांनी संतोष जुईकर यांना पुष्पहार देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर सांगता समारंभ वंदे मातरम् घेऊन करण्यात आला. देहेन गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी परिश्रम घेतले.
सैन्यदलातील कार्यकाळ
हवालदार पदावर कार्यरत असलेल्या संतोष जुईकर यांनी सैन्यदलात 23 जुलै 2003 रोजी अलिबाग येथे भरती होऊन 19 वर्षे भारत मातेची सेवा केली. बंगलोर ट्रेनिंग सेंट्रलमध्ये 23 जुलै 2003 ते 3 मे 2005, त्यानंतर पहिली पोस्टिंग 4 मे 2005 रोजी, 3 फेब्रुवारी 2008 पंजाब, 4 फेब्रुवारी 2008 ते 11 जानेवारी 2010 जन्मू-काश्मीर कुपवाडा, 12 जानेवारी 2010 ते 25 जानेवारी 2013 राज्यस्थान, 3 नोव्हेंबर 2015 वेस्ट बंगाल, 1 डिसेंबर 2015 ते 3 नोव्हेंबर 2018 पठाणकोट, 4 नोव्हेंबर 2018 ते 12 फेब्रुवारी 2021 लडाख 13 फेब्रुवारी 2021 ते 31 मार्च 2022 मेरठ चंदीगड आदी ठिकाणी प्रथम लांस नायक, नायक, हवालदार, अशा पदावर कार्यरत राहून देशसेवा केली. जुईकर यांनी शेवटी सेवानिवृत्त होताना खडतर प्रसंगात सियाचीन, गलव्हन येथे 23 दिवस मायनस 18 डिग्री तापमान असलेल्या नक्षलवादी विभागात सेवा केली.