| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी वेश्वी संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारत स्वाभिमान ट्रस्ट रायगड व पतंजली योग समिती अलिबाग यांच्यावतीने भारत स्वाभिमान न्यास सह कोषाध्यक्ष (महाराष्ट्र पश्चिम) दिलीप रामभाऊ गाटे, युवा भारत प्रभारी (रायगड) दिपक गाटे, भारत स्वाभिमान न्यास कोषाध्यक्ष (रायगड) ज्ञानेश्वर पाटील, तसेच सहयोग शिक्षीका कांचन पाटील यांनी योग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सादरीकरण करत त्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे, होली चाईल्ड सीबीएसई स्कुलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी व होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील यांनी केले.







